Sanket Tambare

← Micro Blog

#१४३२🤍 खंडेराव,💯 कधीतरी आयुष्य विस्कटलेल वाटतं!☹️ जी समीकरण धरून …

Posted
2026-07-14
Type
text

#१४३२ भटकंती...!🎉

#१४३२🤍 खंडेराव,💯 कधीतरी आयुष्य विस्कटलेल वाटतं!☹️ जी समीकरण धरून आयुष्याची व्याख्या असते, त्याची गोळाबेरीज चुकते!🧮 पसरलेल्या पसाऱ्यात मन हरवून जाते!😑 त्याला स्थिरावण्यासाठी लागतं, एक शांत क्षण!🌱 कधी एकांतात, कधी निसर्गात, कधी भटकंतीत हा आपल्याला सापडतो!🌌 प्रत्येकाची भटकंती वेगळी, स्वप्ने वेगळी, निर्णय वेगळे, वाटा वेगळ्या आणि प्रेरणा पण वेगळ्या!🎭 गफलत तेव्हा होते जेव्हा आपलीच भटकंती best हे भासवण्यासाठी समाज माध्यमांवर स्पर्धा सुरू होते!📲 खरंतर किती निर्णय आपण स्वतःसाठी घेतो हे पाहिले तर हे साध सोपं कोड सुटेल!🧘 पण यासाठी social मीडियाच्या बाहेर येऊन डोकावून पाहावे तर लागेल!🤞 या सर्वांच्या बाहेर पडलं की आपलच एक भावविश्व खुलत!🌠 त्यात रमून आपण आपलं जगत राहतो!🌃 कदाचित वाल्डन सारख तळ्याशेजारी राहणं होणार नाही, हेसेसारखी निर्धास्त भटकंती अवघड वाटतं, पण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना!❤️ बाकी, तू तुझी भटकंती शोध!🧭 ती अशी सापडेल की नाही माहीत नाही पण त्यासाठी virtual बंधनं सोडावी लागतील!🤹 या प्रवासात मज्जा येईल एवढं नक्की! ❣️ #१४:०७:२०२६::११:१७:pm 🕰️

Tags: #भटकंती, #खंडेराव, #marathi, #social media