Sanket Tambare

← Micro Blog

#१४३३🎉 खंडेराव, 💯 काळानुरूप काही माणसं मागे पडतात.🤞 प्रत्येकाच्य…

Posted
2026-07-17
Type
text

#१४३३ मुक्तछंद मन

#१४३३🎉 खंडेराव, 💯 काळानुरूप काही माणसं मागे पडतात.🤞 प्रत्येकाच्या prioritise, choices बदलतात!💫 अपेक्षांच्या ओझ्याखाली मन दबत, पण अल्बर्ट एलिस म्हणतो तसं वाजवी अपेक्षाच जर बंद केल्या तर काही प्रश्न मुळापासूनच सुटतात!🌱 Social comparison, constant updates, socially induced needs, या सर्वांमुळेच रोजचा ताण वाढतो हे माहित असूनही जर त्याच तणावात राहण्यात अर्थ काय आहे?🧭 कधीतरी सोशल मीडियावर जुने फोटो, जुन्या लोकांचे नवे फोटो सर्व काही दिसत, जर हे काही दिसलंच नाही तर?💫 इथपर्यंत पोहचण तस अवघड, पण प्रयत्न तर नक्कीच करता येतील ना?🤍 आता जर हे सगळच गेले, तर मोकळ्या वेळेत काय कराल, हा मूलभूत प्रश्न आहे, याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असेलच, पण ते शोधण्यासाठी सुरुवात करावी लागेल एवढे नक्की!⏳ जेवढं लवकर हे कराल, तेवढ्या लवकर या virtual जगाच्या बंधनाच्या बाहेर पडाल!🌌 स्वतःचा शोध घेत निसर्ग भ्रमंती कराल, निवांत काहीही न करत संध्याकाळ घालवाल, कधी उंच डोंगर, कधी विस्तीर्ण पठार, तर कधी न संपणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे बघत, त्या क्षितिजात स्वतःला स्वच्छंदपणे वावर करताना पाहाल!🌠🏞️🌊 मुक्तपणे, निवांत, कोणत्याही सामाजिक बंधनात न जखडता, आपण आपल्याच आकाशाला गवसणी घालण्याची एक संधी या स्वच्छंद मनाला भेटेल! ❤️ बाकी, Social मीडियाच्या चक्रव्यूहातून सुटलास, बरं झालं! स्वच्छंद मनात भरारी घेण्यास तुला शुभेच्छा! ❣️ #१७:०७:२०२६::०८:३७:pm⏰

Tags: #self-reflection, #खंडेराव, #marathi, #social media, #psychology