#1440 खंडेराव,💯 भारावलेले मन कधीतरी उत्साहाने उभारून येते.💫 मनात …
- Posted
- 2026-07-25
- Type
- text
#१४४० भारावलेले मन...!❣️
#1440 खंडेराव,💯 भारावलेले मन कधीतरी उत्साहाने उभारून येते.💫 मनात नवनवीन कल्पनांचा जणू काही कल्लोळ येतो!🎉 क्षणार्धात ते दूर कुठल्यातरी उंच डोंगरावर जाऊन टेहाळणी करू लागते!🏞️ इथे असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींची गोळाबेरीज नकळतच मनात सुरू होते!🔢 खरंतर भटकंतीमध्ये रमलेले मन असंच कधीतरी व्याकुळ होतं हेही तितकंच खरं आहे म्हणा!🤞 बुद्ध, विनोबा, गांधी यांनी दाखविलेल्या शांततेच्या मार्गाने चालणे तितके सोपे नाही हे जाणून ते करत राहणं, याला एक वेगळीच उर्मी लागते!🧘 अशावेळी काहीतरी मोठं आणि interesting करण्याची इच्छा मनात येते!🤔 हळूहळू त्याचा परीपेक्ष वाढू लागतो, संवेदनांची व्याप्ती वाढते आणि संकल्पनांची स्पष्टता येते!✨ काळ, वेळ यांना भेदून अशा संकल्पना जणू काही आयुष्याचा एक अविचल भागच बनतात!🌌 मग त्यासाठी भारावून जाऊन काम सुरू होते!🙂↕️ बघुयात, असच काहीस मनात आहे, काहीतरी concrete झाले, की विस्ताराने विवेचन होईल!🤍 बाकी, मनातल्या द्वंद्वाना सामोरे जा, थोडा वेळ लागेल पण सुटलेले प्रश्न हे मनात राहिलेल्या प्रश्नांपेक्षा चांगले!🧭 विचार करणे आणि विचारात बुडून जाणे यात तशी न दिसणारी ओळ, तेवढं ओळखायला शिक, बाकी गोष्टी होत राहतीलच!❣️ #२५:०७:२०२६::११:५५:pm🕰️