#१४४४💯 खंडेराव,❤️ एखादा व्यक्ती, जागा यांच्या आठवणी दडवून त्यांना …
- Posted
- 2026-08-05
- Type
- text
#१४४४ Are you part of your own tribe?
#१४४४💯 खंडेराव,❤️ एखादा व्यक्ती, जागा यांच्या आठवणी दडवून त्यांना विसरणे शक्य आहे का?🤔 प्रदीर्घ कालावधीसाठी त्याचे काहीच दिसले नाही, तर ती गोष्ट विस्मृतीत जाईल, एवढं नक्की!💫 आभासी जगात असणाऱ्या हजारो मित्रांपैकी खरंच किती आपल्याला ओळखतात, हा मोठा प्रश्न नक्कीच आहे!🤫 जर फक्त तोंडओळख असेल तर त्यांचे रोजच्या अपडेट्स बघण्याची खरंच गरज आहे काय?🤞 नर्मदेच्या खोऱ्यातील नितळ माणसं अनुभवली की आपोआपच एक वेगळी दृष्टी भेटते!🌊 तुम्ही संवादाच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या मनातील गोष्टी चाचपडून पाहता आणि हळूहळू ओळखायला लागता!🤍 मग ज्या ठिकाणी "This is not my tribe" असं प्रकर्षानं जाणवत त्या व्यक्ती, जागा आपसुकच मागे पडतात!🚂 हा कदाचित selfishness वाटू शकतो, पण ही ज्याची त्याची भटकंती असते!🌱 आणि वारंवार असं काही दिसतं राहिलं की गोष्टी दृढ होतात!✍️ It's as if your presence does not matter anymore!😑 मग अशा वेळी तेथून निघणे आणि आपण आपला पंथ शोधणे, हेच गरजेचे!🏞️ जितके स्वतःच्या मनाला पटत नसेल, तर आपण एखाद्या गटात जुळण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे हे खरे, तितकेच व्यक्ती मागे सोडणे महत्त्वाचं!😶🌫️ बाकी, तू सूज्ञ आहेसच, गरज आहे, अशा परिघातून बाहेर पडून खरंच स्वतःच्या परिघात जाण्याची! ❣️ #०५:०८:२०२६::१२:२६:am⏰
Tags: #life, #खंडेराव, #marathi, #social media, #भटकंती