#१४४५💯 खंडेराव,🤍 कधीतरी जेव्हा आयुष्याच्या पटलावर उमटलेले चित्र प…
- Posted
- 2026-08-07
- Type
- text
#१४४५ खंडेरावचे जग
#१४४५💯 खंडेराव,🤍 कधीतरी जेव्हा आयुष्याच्या पटलावर उमटलेले चित्र पाहतो, तेव्हा त्याला त्याच्या भटकंतीच्या परिसिमांची कल्पना येते!🗺️ आयुष्याचा धांडोळा घेताना कधी खंडेरावप्रमाणे गाव दिसते, शिकलेले शहर दिसतं, अनुभवलेला प्रदेश दिसतो, तिथली माणसं आठवतात, जवळच्या आठवणी मनात कल्लोळ करतात!✨ सोशल मीडिया, सामाजिक माध्यम या सर्वांभोवती एक आभासी आवरण तयार करतात, जे तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवते!🌐 अशा अनेक आभासी जगांमध्ये बहुदा सर्व जणच असल्यामुळे एखादा व्यक्ती त्यात अडकतो!🤞 त्यात रमण्याचे फायदे आहेतच, पण त्याचा मानवी क्षमतांवर होणारा परिणाम कधी कळतंच नाही, आणि कळाला तर पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो!🤫 त्यामुळे अशा वाटेला सहसा कोणी भटकंती करताना भटकत नाही!✨ पण असं जगुन पाहिले तर गोष्टी सोप्या नक्कीच होतात!💫 न सुटलेले प्रश्न सुटतात, न उलगडलेली कोडी एकतर सुटतात, किंवा त्यात अडकण्याची गरजच नाही याच शहाणपण येत!🌱 बाकी, गोष्टी चालूच राहतात, गरज आहे त्याला एक सातत्य, नाविन्यतेची जोड देण्याची!❤️ #०७:०८:२०२६::११:०६:pm⏰
Tags: #खंडेराव, #life, #marathi, #social media