Sanket Tambare

← Micro Blog

#१४४६✨ खंडेराव, कधी पुल वाचताना किंवा नाटक पाहताना व्यक्ती आणि त्या…

Posted
2026-08-07
Type
text

#१४४६ व्यक्ती!

#१४४६✨ खंडेराव, कधी पुल वाचताना किंवा नाटक पाहताना व्यक्ती आणि त्याचे अंतरंग याचं एक वेगळच प्रारूप दिसतं!🤍 एखादा किती वरवर बोलत आहे किंवा एखादा खरंच जगुन आयुष्याचे कांगोरे मांडत आहे हे जाणवत!✍️ बहुदा स्वतःला स्वच्छंदी दाखवणारा, या देखाव्याला कधीतरी कंटाळत असेल का?🤔 आभासी जगामध्ये रमत, फक्त तिथे स्वतःच्या प्रतिमेला मोठं करण्यासाठीच कोणी काही करत असेल तर, त्याचा परीघ कधी त्या आभासी जगाच्या पलीकडे गेला नसेलच ना?😶‍🌫️ तसं व्यक्ती हे कोड सोडवण कठीणच, unfiltered माणसं मिळणे तसे जवळपास अशक्यच!🤞 पण यामध्ये आपणही mask घालून किती दिवस वावरणार ना?😑 मग त्यापेक्षा आपण स्वतः मध्येच गुंतणे नक्कीच परवडणारे!🧘 बाकी, आपण आपल्या मार्गाने चालत राहण, भेटणारे योग्य वेळी भेटून जातीलच!🌱 #०७:०८:२०२६::११:२३:pm ⏰

Tags: #खंडेराव, #marathi, #social media