Sanket Tambare

← Micro Blog

#१४४८❤️ खंडेराव,💯 दूर कोण्या डोंगरावरून, किंवा शांत निश्चल समुद्र …

Posted
2026-08-18
Type
quote

#१४४८ आयुष्य!

#१४४८❤️ खंडेराव,💯 दूर कोण्या डोंगरावरून, किंवा शांत निश्चल समुद्र किनाऱ्यावरून एखादा जेव्हा आजूबाजूच्या निसर्गात हरवून जातो तेव्हा त्याला दिसतो, विस्तीर्ण पसरलेल्या त्याचा विस्तार, न थकणारा वारा, न थांबणाऱ्या लाटा आणि बरंच काही!🏞️🌊 तासनतास त्याकडे पाहत राहील की आयुष्यातील समर्पक लाटा म्हणा किंवा आयुष्याचा धांडोळा म्हणा, आपोआप मनाच्या पटलावर उमटतो.🗺️ निसर्गाच्या सौंदर्याने मोहित झालेले हे मन, त्यासारखेच शांत, निश्चल आणि स्थिर होते.🧘 आता हा नकाशा किती विस्तारतो हे ठरते तुमच्या मनाच्या भ्रमंतीवर!🗾 रोज काहीतरी नवीन करत राहण, नवीन गोष्टी करत राहण, नवीन लोकांना भेटत राहणं, विचाराच्या परिसीमांना विस्तारात राहणं तसं अवघडच!🤞 पण एकदा हे कळाले की हीच खऱ्या अर्थपूर्ण आयुष्याची गोष्ट, मग त्यात मन रमत!✨ आभासी सोशल मिडियाचे जग सोडून खऱ्या जगात माणूस जगू लागतो.🌱 याच प्रवासात असंच कोणी सहप्रवासी भेटतो आणि मग हे अविरत सुरू राहतं!💫 बाकी, भ्रमंतीने विस्तार होईल, पण खरी शांतता निसर्गच शिकवतो! तेवढं त्याच्याकडून शिकून घे, बाकी सर्व होत राहीलच!💚 #१८:०८:२०२६::११:४०:pm🕰️

Tags: #life, #स्थितप्रज्ञ, #खंडेराव, #marathi, #calmness