Sanket Tambare

← Micro Blog

#१४५१💯 खंडेराव,💭 प्रदीर्घ काळ भरपूर गोष्टी करत राहिले की, कधीतरी …

Posted
2026-08-27
Type
text

#१४५१ #प्रयत्न

#१४५१💯 खंडेराव,💭 प्रदीर्घ काळ भरपूर गोष्टी करत राहिले की, कधीतरी त्या सगळ्याचा कंटाळा येतो.🤞 कधी लिहिणे, कधी वाचणं, कधी काहीतरी बनवत राहणं, फिरणं, अनुभवातून शिकत राहणं, असं सगळं त्यात आलं!✨ एकाकी मन आडोसा शोधू लागतं.🧘 मनाच्या या पटलावर काहीतरी नवीन करत राहण्याची उर्मी असते, पण कंटाळलेले शरीर थोडं मागे ढकलत!😑 पण एकदा का तो सूर गवसला की, पुन्हा आपल्या गोष्टी करायला ते मोकळं होते!🌱 आपण, आपल्याच लयीमध्ये राहून, नवनवीन क्षितिजाला गवसणी घालत राहण, यात एक वेगळीच मज्जा आहे.💫 कदाचित दुसऱ्यांसाठी बेफिकीर तुम्ही, स्वतःसाठी स्वच्छंदी असता!🧡 आभासी जगामध्ये न रमता, त्याची बंधने झुगारून, आपल्याला आवडेल ते करत राहण तसे तुलनेने अवघड!✌️ पण, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं, प्रदीर्घ काळाच्या संघर्षानंतर या आभासी जगातून सुटला आहे, त्यामुळे त्यात परत गुंतू नकोस एवढंच!🤍 #२७:०८:२०२६::१०:४१:pm⏰

Tags: #life, #self-reflection, #खंडेराव, #marathi, #digital detox