Sanket Tambare

← Micro Blog

#१४५२💯 खंडेराव, 💭 एक साचेबद्ध आयुष्य जगणं तसं सोपं, खरी कसोटी लाग…

Posted
2026-09-01
Type
text

#१४५२ एक साचेबद्ध आयुष्य!

#१४५२💯 खंडेराव, 💭 एक साचेबद्ध आयुष्य जगणं तसं सोपं, खरी कसोटी लागते, वेगळी वाट धुंडाळत, एक नवीन रस्ता शोधण्यामध्ये!🌱 आधुनिक जगामध्ये सोशल मीडियाचे जीवनातील स्थान तसे महत्त्वाचे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही, असे सर्वांना वाटते! 🤞 पण काहीतरी मोठं करायचं असेल, तर मात्र त्यात न अडकलेलेच बरे, हे शहाणपण यायला थोडा वेळ लागतोच.✨ अल्बर्ट एलिस म्हणतो तसं, स्वतःकडून अपेक्षा ठेवा, दुसऱ्याकडून नाही. 💫 जर अपेक्षाच नसतील, तर अपेक्षाभंगच होणार नाही, सोपं आहे ना?😃 आता खरा प्रश्न राहतो, हे असं एकटं राहणं, खरंच गरजेचा आहे? 🤔 Beyond the obvious, अशी इंग्रजीमध्ये एक संज्ञा आहे. 🧘 प्रगल्भतेने समोरच्या दृष्ट्याकडे पाहून, अनुभवांकडे पाहून, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे, तसे अवघड! प्रयत्नांती ते शक्य होते, पण त्याची सवय लावणे तसे मेहनतीचे काम!🤞 आता या सर्वांमध्ये प्रचलित प्रथा परंपरांना बाजूला ठेवणे आलेच, ते तेवढे जिकरीचे काम आहेच म्हणा! 😑 बाकी, गोष्टी होत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात, खरंच काहीतरी अर्थपूर्ण, करत राहणं महत्त्वाचं! 🌱 लोकांचा विचार करत बसण्यात आणि वायफळ ऊर्जा घालवण्यामध्ये काय अर्थ आहे तसा? 🤔 #01:09:2026::11:59:pm⏰

Tags: #self-reflection, #life, #खंडेराव, #marathi, #social media