#१४५३❤️ खंडेराव,💯 शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!💭 खरंतर अनुभव हेच सर्वो…

- Posted
- 2026-09-05
- Type
- text
#१४५३ शिक्षक दिनानिमित्त!
#१४५३❤️ खंडेराव,💯 शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!💭 खरंतर अनुभव हेच सर्वोत्तम गुरु!🌱 मानवी मनाचा ठाव घेत, त्याला आकार देण्याच काम, शिक्षकांचं!✨ तळमळीने शिकवणारे, मनापासून प्रयत्न करणारे, सुप्त गुणांना वाव देणारे, कैक गुरु आजपर्यंत भेटले.💭 अजूनही नित्यनियमाणे एखाद्या कृतीचे आठवणीने कौतुक करून प्रोत्साहन देणारे अनेक गुरू आजही जवळ आहेत, याचे भान आहे.❣️ खरंतर सर्वजणचं काहीतरी शिकवत असतो, किती संवेदनशीलतेने आपण त्याला मनावर घेतो, हा खरा प्रश्न!✌️ "वेळ"ही तसं खुप काही सांगून जाते, काळानुरूप बदलत जाणारे लोक, वेगवेगळे अनुभव, तसं बरंच काही मनावर बिंबवत!⏳ कधीतरी सर्वच निरर्थक वाटतं, त्यावेळी एकटेपणाच्या गर्तेत व्यक्ती अडकतो, मग अशा वेळी त्याच्यातलाच एक विवेकी अंश त्रयस्थपणे विवेकी सल्ला त्याला देतो, आणि अगदी असच, तोच स्वतःचा गुरू होऊन जातो!❤️ अशा या सर्व गुरुंना, खंडेराव, अनुभव, वेळ आणि आपण सर्व, शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!🤍 #०५:०९:२०२६::०८:४६:am🕰️