Sanket Tambare

← Micro Blog

#१४५५💯 खंडेराव,✨ एक सुंदर प्रश्नाने मनाचा ठाव घेतला.💫 स्वप्नातील …

Posted
2026-09-10
Type
text

#१४५५ प्रगल्भता, AI...!💭

#१४५५💯 खंडेराव,✨ एक सुंदर प्रश्नाने मनाचा ठाव घेतला.💫 स्वप्नातील घटना तशा लगेच विसरतात, पण हा प्रश्न मागे राहिलाच!🤍 "इथून पुढे २०-३० वर्षांमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची राहील आणि त्यासाठी आज मी काय करत आहे?"🤔 खरंतर AI च्या जगात याचा विचार सर्वांनी केलाच पाहिजे, प्रश्न हा आहे, आपण तो करत आहोत का?🤞 लागलीच मनात आले, लेखन, वाचन आणि प्रगल्भतेला चालना देणारे जे काही आहे, ते करत राहणं!🎭 तसतर कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक कारणाची गरज असते. 😀 सर्वजण जेव्हा समाजमाध्यमांमध्ये अडकलेले असताना, अशा वेगळ्या वाटेवर जायला दृढनिष्ययच लागतो. तोच काहीसा यातून मिळत असावं बहुदा!❣️ बाकी, वेगळी वाट धुंडाळताना लागणाऱ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा!🎉 #खंडेराव_उवाच💭 #१०:०९:२०२६::०८:२४:am⏰

Tags: #ai, #life, #खंडेराव, #marathi