#१४५८💯 खंडेराव,✨ भटकंती केलेलं मन, सहसा कुठे अडकत नाही.💭 कधी निरा…

- Posted
- 2026-09-18
- Type
- text
#१४५८💯 #खंडेराव_उवाच💭 #भटकंती...!❣️
#१४५८💯 खंडेराव,✨ भटकंती केलेलं मन, सहसा कुठे अडकत नाही.💭 कधी निराशेने ग्रासले, की ते कधी हरिश्चंद्र गडावर असलेल्या मुक्कामात अनुभवलेल्या ढगांमध्ये हरवते, तर कधी संध्याकाळी/ सकाळी शांत पण तेवढ्याच रौद्र समुद्राकडे पाहत राहते.🌊 त्याला स्वातंत्र्य असत, कुठेही कधीही भटकण्याच, समोर दिसणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन पाहण्याच!💫 कुठे शांत डोंगरावर जाऊन टेहाळणी करत बसलेलं मन, ते दृश्य असं काही मनात कैद करत, की कधीही तेथे आपसुकच जाऊन पोहचत!🌄 अनुभव, जागा, नव्या व्यक्ती, नवी क्षितिजे मनाला असं काही व्यापून टाकतात की, निराशा त्याच्या जवळ सहसा भटकत नाही!🧘 बाकी, या जगाच्या शोधात, स्वतःला स्वच्छंदपणे शोध. खोल मनामध्ये दडलेल्या स्वतःला मोकळं वावरण्याची संधी दे!🎭 सगळ काही असं काही सुंदर होऊन जाते की, व्यक्ती आपसुकच बदलून जातो!❣️ #खंडेराव_उवाच🌱 #१८:०९:२०२६::११:११:pm ⏳
Tags: #self-reflection, #travel, #खंडेराव, #भटकंती, #marathi