Sanket Tambare

← Micro Blog

#१४५९✨ खंडेराव,✨ रोज खंडेराव वाचून हा खंडेराव नेमकं कोण असा प्रश्न …

Posted
2026-09-19
Type
text

#१४५९ खंडेराव...!💭

#१४५९✨ खंडेराव,✨ रोज खंडेराव वाचून हा खंडेराव नेमकं कोण असा प्रश्न पडला असेलच!🤔 नेमाडेंच्या हिंदू या कादंबरीतील एक पात्र, खरंतर मुख्य पात्र!😀 आजूबाजूच्या आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थितीचे आकलन करून त्याचे आपल्यासमोर प्रकटन करण्याचं त्याच काम!💭 मी जेव्हा खंडेराव मांडतो, तेव्हा माझ्या अनुभवांना एक मूर्त रूप देण्यासाठी त्याचा उपयोग करतो एवढंच!❣️ त्रयस्थपणे सर्वकाही पाहत, समजून घेत, हे सर्व मांडणं, हेच याचं औचित्य!❤️ प्रत्येकाच्या मनात खंडेराव असतोच, काही ठिकाणी तो व्यक्त होतो, तर काही ठिकाणी, आतच राहतो!🤞 बाकी, तुमच्या मनातला खंडेराव, तुम्हाला सापडला?🎭 #१९:०९:२०२६::११:०५:pm⏳

Tags: #खंडेराव, #marathi, #मन, #self-reflection, #philosophy, #life