#१४६०💯 खंडेराव,💭 कधी एखाद्या दिवशी खूप काही होत.✌️ जेमतेम ३-४ तास…

- Posted
- 2026-09-28
- Type
- text
#१४६० अस्वस्थ मन...!
#१४६०💯 खंडेराव,💭 कधी एखाद्या दिवशी खूप काही होत.✌️ जेमतेम ३-४ तास झोपून, २०-२२ किमी पळून, दिवसभर जेव्हा तुम्ही फिरत असता, तेव्हा एक प्रश्न नक्कीच पडतो, ही ऊर्जा नेमकी येते कुठून?🤔 वैचारिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अगदी सर्वच अंगांनी अस सगळं काही होत असत तेव्हा, मानवी मन, शरीर आपसुकच प्रोत्साहित होत.💯 काय चुकीचं, काय बरोबर, काय महत्वाच, काय काम महत्वाच आणि कशाला महत्त्व नाही, याचा उलगडा या द्वंद्वात अडकलेल्या मनाला होतो.🤍 जणुकाही या सर्व प्रक्रियेत त्याला सत्य गवसत!🧘 मन शांत होतं, शरीर तृप्त होतं, चित्त स्थिर होतं, मनाला अस्वस्थ करणारे हजारो प्रश्न नाहीसे होतात, नव- ऊर्जेने प्रफुल्लीत मन, ध्यासाने पुढे जात राहत!🌱 बाकी, अस्वस्थ रात्री येत राहतीलच, त्याला खरंच सोडवायचं असेल, तर लागेल मनाला प्रफुल्लीत करणारा एक क्षण!🌄 #२८:०९:२०२६::०१:२१:am ⏰
Tags: #marathi, #self-reflection, #running, #life, #मन