#१४६४💯 खंडेराव,✨ वेगळ्या वाटेवर भटकंती करताना, सर्वच गोष्टींसाठी त…
- Posted
- 2026-10-08
- Type
- text
#१४६४ सातत्य
#१४६४💯 खंडेराव,✨ वेगळ्या वाटेवर भटकंती करताना, सर्वच गोष्टींसाठी ती गोष्ट का करायची याची इतक्या लवकर कधीच उत्तर भेटत नाही.💭 मग, एक मोठा अडथळा असतो, त्या गोष्टीमध्ये सातत्य आणि नाविन्यता ठेवणं!✨ सातत्यासाठी ती गोष्ट सतत करत राहणं महत्त्वाचं!🤞 कधीतरी मनाला कंटाळा येतो, ती लय तुटते, गरज असते, त्या स्थितीमध्ये सुद्धा, परत हळूहळू त्या लयीमध्ये परत येण्याची!❣️ मग ते वाचन असो, लिखाण असो, शिकणं असो, पळणे असो वा स्वतः स्वतःचा शोध घेत स्वतः मध्ये अडकून राहणं!💫 मग कधीतरी दीर्घ काळानंतर सर्व कोडी अशी सुटतात, की प्रवास, समग्र चित्र, आयुष्य सगळं कसं सोपं होऊन जाते!🤍 बाकी, कधीतरी असं प्रवाहामध्ये वाहत राहा, वेगळा प्रवाह निवड, अर्थ, कारण सगळं भेटतं राहीलच!🌱 #०८:१०:२०२६::११:५२:pm ⏰
Tags: #marathi, #self-reflection, #learning, #philosophy