Sanket Tambare

← Micro Blog

#१४६६💭 #So_called_democracy✍️ खंडेराव,✨ जळणाऱ्या जंगलाच्या जवळच्या…

Posted
2026-10-10
Type
text

#१४६६ So called democracy...!

#१४६६💭 #So_called_democracy✍️ खंडेराव,✨ जळणाऱ्या जंगलाच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या दाहकतेची जाण असते.🔥 हळूहळू ती आग शहरात पसरते, मग एके दिवशी अचानक जागे होऊन, हे एवढं सगळं कधी झालं, हा प्रश्न एखाद्याचा मनात येतो!🌇 खरंतर दूर जंगलातील आगीची मजा घेत, त्याला दुर्लक्षित करणारा हाच तो व्यक्ती!🤞 बाकी महागाई, प्रदूषण, वातावरणीय बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, या सर्वांच्या रूपाने ही आग शहरात पोहचलेलीच आहे.🤐 आत्मकेंद्री समाजामध्ये, स्वतःच्याच वर्तुळात आणि सोशल मीडियाच्या जगात राहणाऱ्यांना याची जाणीव व्हायला वेळ लागेलच म्हणा!🤔 कधीकाळी मणिपूर मध्ये ती आग लागली, ती आजही जळत आहे, ही गोष्ट वेगळी!😬 कोकण, सह्याद्री, दिल्ली, स्पर्धा परीक्षा सगळीकडच आता ही आग पसरत आहे.😶‍🌫️ आता, ही गोष्ट जेवढी लवकर समजेल, तेवढं किमान तुमच्या विवेकी स्वत्वा साठी बरं!🌱 बाकी, आतला विवेक मरेल, एवढं कठोर मन झालं, तर त्यातला माणूस किती उरला, हा प्रश्न आहेच!😑 #Delhi💥 #१०:१०:२०२६::०८:०४:am ⏰

Tags: #marathi, #politics, #social, #philosophy, #self-reflection, #maharashtra, #खंडेराव