Sanket Tambare

← Micro Blog

खरंच कुठे चाललोय आपण? एका बाजूला बघितले तर युरोपियन देशांमध्ये काय …

Posted
2018-12-06
Type
text

खरंच कुठे चाललोय आपण? एका बाजूला बघितले तर युरोपियन देशांमध्ये काय चालू आहे डेटा प्रायव्हसी लॉज मानवी हक्क याविषयी जागरुकता जाणिवा आणि काही नवीन कायदे… का बघू या भारतात काय चालू आहे? हनुमानाची जात कोणती? शहरांची नाव बदलण्याचा प्रकरण तर रोजच येत आहे. पुतळे बांधणीची तर जणू स्पर्धाच चालू.आहे. निवडणुकांमध्ये आधी आश्वासन म्हणून प्रगती करण्याचे सांगितले जात होते आम्ही तुम्हाला शिक्षण देणार, नोकरी देणार. मग आता सांगितलं जातं की आम्ही सत्तेत आलो तर राम मंदिर बांधून देऊ, शहराचे नाव बदलू? खरंच जे मूळ विकासाचे मुद्दे शिक्षण नोकरी व्यवसाय यांपासून आपण भरकटतोय का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आज इतके घोटाळे होत आहेत? राफेल घोटाळा असेल, नीरव मोदीचे प्रकरण असेल, विजय मल्ल्या चे प्रकरण असेल, इतर काही घोटाळे असतील… मध्यंतरी मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांवर चर्चा व्हायच्या वाजवी वागायचे आणि त्याविषयी जागरूकता यायची पण आता तेही बंद झाले. इतिहासाचे पुरावे देऊन आपण किती दिवस जगणार आहोत? कधीतरी भविष्यातील दिवसांचा पण विचार करावा लागेल ना? काही झाले तरी महाभारत आणि आपला प्रगल्भ इतिहास आहे ना आपल्याकडे अशा आविर्भावात आहोतच ना आपण. तरच कलामांनी पाहिलेले 2020 चे स्वप्न काय होते? “विज्ञानवादी लोकांचा भारत”, “प्रगतशील लोकांचा भारत” हेच ना ते? खरंच गरज नाही का आपल्याला आत्मचिंतनाची? का परत पुढच्यावेळी म्हणायचे की मोदी सरकारने हे केले नाही ते केले नाही? इथे आपण काय केले हे बघणे महत्वाचे नाही का याच विचारांनी अस्वस्थ होते मन. खरंच करून आपण कलामाचे स्वप्न पूर्ण? का त्या स्वप्नाला फक्त कलामांचे स्वप्न म्हणून सोडून देणार आहोत आपण? तर चला विचार करूया काय करू शकतो आपण भारतीय तरुण म्हणून? ~संकेत तांबारे, [email protected] Retweet if you agree…

Tags: #politics, #public policy, #marathi, #history, #data privacy