Family… कुटुंब…. परिवार… काहीही म्हणा पण हा शब्द आठवण करून देतो, एक…
- Posted
- 2019-05-15
- Type
- photo
Family… कुटुंब…. परिवार… काहीही म्हणा पण हा शब्द आठवण करून देतो, एका सुवर्णमय प्रवासाची, सुखकारक आठवणींनी भरलेल्या प्रेममय क्षणांची, अगदी बालपणापासून अनुभवलेल्या आजी-आजोबांच्या सहवासाची… तसे पाहिले तर माझ्या कुटुंबात आहेत १४ लोक… आई बाबा, आजी-आजोबा, 4काका-काकू, ५भाऊ-बहीण… तसा घरात मीच सगळ्यात मोठा, त्यामुळे अर्थातच माझे सर्वात जास्त लाड पुरवले गेले… बालपणाविषयी बोलायचं झालं तर, मी अगदी तुपा-दुधात वाढलो,… राहत्या वाड्यात अजून चुलत भाऊ आणि चुलत बहिणी तर होत्याच…. आजोबांनी शिकवलेली बाराखडी, पाढे, आणि वाचन, खरंच खूप सुंदर असं हे बालपण… एक मात्र आहे, मला वाटते ते करायचं स्वातंत्र्य आहे. कधीही कुठेही आणि काहीही हवे असल्यास मला दुसऱ्या क्षणाला ते मला मिळालेले असते… म्हणूनच I feel I am lucky to have such a great family… And all will be there for me always… #कुटुंब #बालपण #I, Me,and,MyFamily… #१५:५:२०१९::८:३९:pm