Sanket Tambare

← Micro Blog

रम्य ती एक रात्र… हो, अशीच होती ती रात्र…! चांदण्यांच्या कुशीमध्ये,…

Posted
2019-05-23
Type
text

रम्य ती एक रात्र… हो, अशीच होती ती रात्र…! चांदण्यांच्या कुशीमध्ये, स्वप्नांच्या खुशिमध्ये…! मग्न त्या आठवणींमध्ये, त्या सुप्त गाण्यांमध्ये…! त्या एखाद्या व्यक्तीच्या आठवणींची, तिच्या नसण्याचा चाहुलीची…! अन् मग अस्वस्थ होणाऱ्या त्या मनाची, मनात घालमेल निर्माण करणाऱ्या त्या विचारांची…! असच त्या मोहक स्वप्नांची, होती एक रम्य रात्र…! यातून निघाल्यावर, उभरत्या स्वप्नांची…! स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत काढणाऱ्या विचारांची…! अकल्पित स्वप्नांच्या दुनियेतली, अचाट अशा काल्पनिक विश्वातील सफरीची…! अशीच असते ना ती एक रम्य रात्र… #२२:५:२०१९::११:५१:pm — Sanket

Tags: #marathi, #nightsky, #मन, #love