दादा एक गुड न्यूज आहे…🎭🎭🎭 कलाकार: ऋता दुर्गुले (फुलपाखरू fame): …
- Posted
- 2019-07-21
- Type
- quote
दादा एक गुड न्यूज आहे…🎭🎭🎭 कलाकार: ऋता दुर्गुले (फुलपाखरू fame): मन्या उमेश कामत: विनीत,दादा ऋषी मनोहर: बॉबी आरती मोरे: नलिनी मन्या आणि दादा एक सुंदर गुड न्यूज सांगायला आलेत…🎭🎭🎭 ही कथा आहे सुंदर अशा बहीण-भावाच्या बंधनाची… परिस्थितीमुळे बदलत जाणाऱ्या दादाची… ऐन विशीत आयुष्याच्या एका कठीण वळणावर पोहचलेल्या तरुणीची… थोड्याश्या मिश्किल पण प्रेमळ बॉबीची… अनेक जबाबदाऱ्यांमध्ये जखडलेल्या आणि स्वतःला विसरलेल्या विनीत आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या नालिनीची… मनाला भावणारी कथा, उत्तम संगीत, प्रेक्षकांच्या मनाचा मागोवा घेऊन लिहिल्या गेलेल्या उत्तम संवादाचे, हास्यात्मक प्रसंगांनी गुंफलेल्या कथेचे, हृदयस्पर्शी गीते, आणखी बरेच काही; या सर्वांचे अदभुत मिलाप म्हणजे “दादा एक गुड न्युज आहे” हे दोन अंकी नाटक… अचानक समोर आलेली एक धक्कादायक बातमी, त्यामुळे बहीण भावाच्या आयुष्यावर झालेले परिणाम, त्यातूनच बालपणी घडलेल्या घटनांची उलगड, भावाला त्रास होईल म्हणून घर सोडून निघालेली बहीण आणि बाहिणीसाठी परदेशी नोकरी करण्याची मिळालेली संधी सोडून देणारा भाऊ, सर्वच कसे अगदी अनाकलनीय, अदभुत आणि अवर्णनीय… आयुष्यात नेहमी अपेक्षांच्या मागे पळून आजच्या अमूल्य क्षणाकडे न दिलेले लक्ष, आयुष्यात एका तडजोडीसाठी दुसरी तडजोड न करण्याचा संदेश, आणखी बरंच काही… नाटकाच्या शेवटी असलेले “फुलोका तारोका सबका केहना है, एक हजारों मे मेरी बेहना है…"प्रेक्षकांना नक्कीच भावुक करते… आणि सर्वात महत्वाचे प्रेक्षकांच्या मनाला पूर्ण प्रयोगामध्ये अविरतपणे, खेळवून ठेवणारा सर्वच कलाकारांचा अभिनय… एकदा तरी नक्की बघावे असे नाटक… #२१:७:२०१९::२:०२:am Sanket