Sanket Tambare

← Micro Blog

#कविता तीच ती एक प्रेमळ भावना… ……………………………………………. आज पुन्हा उंचबळून…

Posted
2019-08-08
Type
quote

#कविता तीच ती एक प्रेमळ भावना… ……………………………………………. आज पुन्हा उंचबळून आल्या भावना सर्व… आर्त आणि अनर्त अगदी सर्वकाही… हिरव्यागार निसर्गाच्या कुशीमध्ये…. थंड वाऱ्याच्या प्रवाहांमध्ये…. जणू हळूवार येणाऱ्या पावसाच्या तूषारांमध्ये… निःशब्द अशा दूरच्या डोंगरामध्ये… धुक्यानी आच्छादलेल्या त्या डोंगररांगांमध्ये…. मध्येच येणाऱ्या एखाद्या अंधाऱ्या बोगद्यांमध्ये… त्या नागमोडी वळणांच्या घाटांमध्ये… अगदी इंचावर खोल दरी असलेल्या त्या सुंदर रेल्वेमध्ये… दाटून येतात त्या सर्व भावना… मैत्री, आकर्षण, रम्य प्रेमापासून…. कदाचित न ओळखता येणाऱ्या त्या अनोळखी डोळ्यांमधील, हळूच होणाऱ्या त्या क्षणिक स्पर्शातील भावनापर्यंत… अगदी कुतूहलाच्या कवडस्यांतील त्या मनाच्या कोपऱ्यात डोकावणाऱ्या भावना… मैलांचे अंतर अगदी मनाच्या वेगाने धाऊन त्या व्यकीचा मागोवा घेणाऱ्या त्या भावना… या मनाच्या हायवे वरती अगदी वाऱ्याच्या वेगाने वाहणाऱ्या त्या प्रेमभावना… हिरवा शालू नेसलेल्या वनश्री मध्ये मन प्रफुल्लित करणाऱ्या त्या भावना… अगदी अशा रम्य वातावरणात, कोणीतरी जवळ नसण्याची भावना… पण इतक्यात, मनाने घेतलेल्या कित्येक मनांचा मागोवा आणि नकळतपणे घातलेली मनाची समजूत… आणि हे सर्व काही त्या एकाच भावनेमध्ये… मनाचा वेध घेता घेता झालेली दमछाक… सर्व काही प्रेमळ, रोमँटिक वगैरे वगैरे… खरंच ना…??? ~संकेत #८:८:२०१९::१२:२७:pm #मन #भावना #प्रेम #पाऊस #निसर्ग #लोणावळा

Tags: #marathi, #travel, #मन, #भटकंती, #love