Sanket Tambare

← Micro Blog

प्रस्थापित व्यवस्थेत बदल हा नेहमीच अशांतता निर्माण करतो. पण जेव्हा …

Posted
2019-08-28
Type
quote

प्रस्थापित व्यवस्थेत बदल हा नेहमीच अशांतता निर्माण करतो. पण जेव्हा पाणी गळ्यापर्यंत येते, तेव्हा मात्र नक्कीच काहीतरी विचार करावा लागतो. उच्च शिक्षण मिळणाऱ्या एखाद्या नामांकित महाविद्यालयामध्ये जेव्हा रात्री शॉर्ट्स वर मुलांना फिरण्यास मनाई केली जाते तीच ही अशांतता. नियमांच्या नावाखाली प्रस्थापित कॉलेज लाईफ मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जेव्हा रोखले जाते, तेव्हा जी निर्माण होते ना तीच ही अशांतता. कदाचित काही न खचून प्रयत्न करत राहतात. पण काही व्यक्तींमुळे वारंवार संस्कृतीचे दिले जाणारे दाखले, बदल न स्विकारण्याची वृत्ती, आणि कदाचित प्रस्तापित साच्याचा बाहेर काहीही न करता, मुलांच्या व्यक्तिमत्व बदलाची अपेक्षा करणारे हे लोक. काहीशी अशीच स्थिती आहे. चिंताजनक पण आहे. पण बदलाचे प्रयत्न चालू आहेत. काही आशावादी शिक्षकांच्या जोरावर हे चालू राहील याबाबतीत काही वाद नाही. खरंतर समस्या ही याच काही विशिष्ट व्यक्तीच्या मानसिकतेची आहे. आणि हे काही उच्चपदस्थ आहेत हीच मोठी शोकांतिका आहे. ~Sanket #28:8:2019::12:46:am Sanket

Tags: #marathi, #life, #social, #sanky, #youth