Sanket Tambare

← Micro Blog

आईन्स्टाईन: सापेक्षतावाद सांगणारा माणूस… “अल्बर्ट आईन्स्टाईन” या व्…

Posted
2019-09-04
Type
photo

आईन्स्टाईन: सापेक्षतावाद सांगणारा माणूस… “अल्बर्ट आईन्स्टाईन” या व्यक्तीच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करून लोकांपुढे आईन्स्टाईन मांडण्याचा एक उत्तम प्रयोग… विज्ञान वादी आईन्स्टाईन… युद्ध विरोधी आईन्स्टाईन… विवेकवादी आईन्स्टाईन… शास्त्रज्ञांना देव मानणारा आईन्स्टाईन… अगदी सोप्या भाषेत सापेक्षतावाद आणि इतर भौतिक शास्त्रातील कल्पना सांगण्याचा एक प्रयत्न… अगदी बालपणापासून प्रश्न विचारण्याची असलेली सवय, तरुण वयात ज्ञान मिळवण्यासाठी धडपड, आणि नंतरच्या काळात व्यवस्थेशी दिलेला लढा, जर्मनीत ज्यू असल्यामुळे झेलावे लागणारे अत्याचार आणि बरच काही… या आपल्या समीकरणाचा उपयोग करून बनवलेल्या अणुबॉम्ब मुळे बेचिराख झालेल्या जपान आणि त्यामुळे अस्वस्थ झालेले अल्बर्ट आईन्स्टाईन… आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात भेटलेली मिलेवा, हेलेन आणि एल्सा यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेले बदल… आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन देखील त्यांनी विचारलेला प्रश्न, मी प्रश्न विचारायचे का थांबवू…? शेवटी मी जरा जास्तच आत्मकेंद्री झालो आणि त्यामुळे जवळच्या माणसांकडे लक्ष देऊ शकलो नाही ही व्यक्त केलेली खंत… आणि हो, हे सर्व 75 मिनिटात मिनिटात… मनाला खिळवून ठेवणारा हा एक नाट्याचा उत्तम प्रयोग… मुख्य अभिनेते: Dr. शरद भुताडिया लेखक: Gabriel Emanuel मराठी अनुवाद: प्रा. शरद नावरे निर्मिती: प्रत्यय कोल्हापूर #PlayReview #4:9:2019::8:47:pm

Tags: #biography, #book review, #marathi, #scientific temperament