#मराठी_रंगभूमी_दिन मराठी रंगभूमी… चित्रपटाच्या या युगात आजही मराठी …
- Posted
- 2019-11-05
- Type
- photo
#मराठी_रंगभूमी_दिन मराठी रंगभूमी… चित्रपटाच्या या युगात आजही मराठी रंगभूमीने स्वतःचे वेगळे स्थान आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे प्रयोग, विविधांगी विषय आणि अप्रतिम अभिनय ही याची काही वैशिष्ट्ये. दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर है। पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला. #5:11:2019::8:28:pm
Tags: #history, #maharashtra, #marathi