Sanket Tambare

← Micro Blog

अशीच काहीशी होती ती एक रात्र, हवेत होती प्रेमळ वाऱ्याची एक झुळूक; द…

Posted
2020-02-07
Type
text

अशीच काहीशी होती ती एक रात्र, हवेत होती प्रेमळ वाऱ्याची एक झुळूक; दुरूनच अंधारात दिसली एक अंधुकशी आकृती, तिच्या गालावरची स्मितहास्याने मनात निर्माण केलेली खुशी; जशीजशी येऊ लागली ती जवळ, हृदयातली धडकन वाढली Exponential; काळोख एकटाच राहिला आता वातावरणामध्ये, गुलाबी थंडी मध्ये समोर होता table एक; मेणबत्तीच्या प्रकाशात दिसणाऱ्या चेहरा स्वप्ने रंगवत होती अनेक, भुंग्यांच्या आवाजात शांतता देखील होती एक; हळूहळू प्रेमाची फुलपाखरे उडू लागली अनेक: दुरूनच येऊ लागला थोडासा आवाज, त्या अंधुक प्रकाशात तिचा चेहरा मात्र राहिला मनात; इकडून तिकडे जाताना शोधतो त्या चेह-याला मी आता, वेड्या मनाची समजूत घालताना व्याकुळ होते मन झोपी जाता जाता; रोज सकाळी असते एकच आशा, भेटेल ती आज आणि संपून जाईल ही निराशा; ~संकेत… #७:२:२०२०::१२:२४:am

Tags: #daredavil01, #love, #marathi, #मन