#538 तबलिकी, निजामुद्दीन, कारोना, communalism असेच काही शब्द… दुसऱ्…
- Posted
- 2020-04-02
- Type
- photo
#538 तबलिकी, निजामुद्दीन, कारोना, communalism असेच काही शब्द… दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, हिंदू, मुस्लिम, असे काही शब्द… रोज केलेल्या थोड्या थोड्या मेहनतीने धर्मनिरपेक्षतेची भावना वाढवली जाते आणि अचानक कट्टरवादी एक छोटी मोठी लाट येते आणि सगळं वाहून जात…! असं का आहे सामाजिक सद्भावना ठेवणं चुकीच आहे का, आपल्यातील प्रेम आपुलकी एवढी पोकळ का असते ? दिल्लीतील जमातचा तबलिगीच्या कार्यक्रम चुकीचा आहे, निंदनीय आहे किंबहुना देशविरोधी आहे. पण याने सर्व जातील उद्देशून बनवला जात असलेला अजेंडा पण तेवढाच चुकीचा आहे..! त्या कार्यक्रमा सोबतच आपण करत असलेली भाजी मंडईतील गर्दी पण तेवढीच चूकीचीच आहे. त्या कार्यक्रमा नंतर “ कोरोना जिहाद ” सारखा शब्द उदयास येतो… आणि भांडण लावून स्वार्थ साधणाऱ्या लोकांच्या जाळ्यात आपण अगदी सहज पद्धतीने फसून जातो, असं का आहे ? खरंच ही वेळ देशात धार्मिक मुद्यावर न्यूज चॅनल्स वर debate करण्याची आहे का? इटली, स्पेन यांच्याकडून आपण खरंच काही धडा घेतला आहे का? जसं घरात बसून कोरोना पसरू देऊ नये हे नागरिकांचे कर्तव्य आहे तसे नागरिकांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या बातम्या दाखवणे, फक्त TRP साठी त्याच त्याच धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या दाखवणे न्यूज चॅनल्स साठी नैतिक आहे का? अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मी पूर्णपणे घसरलेल्या लोकशाहीच्या चौथा स्तंभ “मीडिया” कडून अपेक्षा देखील ठेवणार नाही. पण महान विचारवंतांच्या वैचारिक वारसा लाभलेल्या आपल्या देशात, कोरोना सारख्या शत्रुसोबत लढायचे असेल तर नक्कीच नागरिकांनी विवेकी होणे गरजेचे आहे, धर्मांध नाही, असे मला वाटते. अशा काळात धर्म, जात, पंथ या सर्वांना विसरून मानवतावादी भूमिकेने एकत्र येणे गरजेचे आहे. टीप: वरील मत माझे स्वतः चे आहे आणि याचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही. ~संकेत मोबाईल: ८२०८००५२१५ #2:4:2020::12:09:pm