Sanket Tambare

← Micro Blog

#६६१ खरंच इतके आत्मकेंद्री झालो आहोत का आपण? धर्माचा आंधळा चष्मा ला…

Posted
2020-07-14
Type
text

#६६१ खरंच इतके आत्मकेंद्री झालो आहोत का आपण? धर्माचा आंधळा चष्मा लावून खरंच महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करतोय का आपण? थोडक्यात “ये दुनिया जालीम है” असच काहीसं म्हणणार ना आपण जेव्हा आपल्यावर वेळी येइल? मग आता काय करतोय आपण? उठा! जागे व्हा! आणि, उघड्या डोळ्याने काय होत आहे ते पहा! या प्रोपोगांडा मशीन चे आपण एक भाग तर नाहीत ना? थोडासा नक्की विचार करा याविषयी. आणि, हा महत्वाचं जरी विश्वास बसत नसला तरी विचार करा; हा सोशल मीडिया मला manipulate तर करत नाहीये ना? खरंच हे माझे विचार आहेत? खरंच हजारो प्राणी, माणसं यांच्या मरणाला मी कळत नकळत समर्थन तर करत नाहीये ना? मला माहिती आहे, “विवेक” हा शब्द थोडासा डाव्या चळवळीतला वाटतो, पण मानवी गुणधर्म आहे हे मात्र नक्की! ध्येय, मूल्य, अशा काही शब्दांविषयी नक्की विचार करा, आयुष्याला अर्थ देतात हे! तर विचार तर कराल ना? #विचार_तर_कराल #१४:७:२०२०::११:३०:am

Tags: #marathi, #social media, #self-reflection, #digital manipulation, #scientific temperament