#६८२ #निर्माण एक अर्थपूर्ण आयुष्य शोधण्यासाठी मदत करणारा एक सुंदर प…
- Posted
- 2020-07-25
- Type
- photo
#६८२ #निर्माण एक अर्थपूर्ण आयुष्य शोधण्यासाठी मदत करणारा एक सुंदर प्रवास…! या प्रवासात जीवाला जीव लावणारी, खरंच dedication म्हणजे नेमकं काय हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवणारी अनेक साथीदेखील भेटले, स्वतःच्या ध्येय प्राप्तीसाठी अहोरात्र झटणारे, अगदी प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे असे लोक भेटले! कॉलेज मध्ये सुरुवातीला स्टुडंट्स activity च्या अंतर्गत विविध प्रश्न निर्माण होत होते. नंतर विवेकवाहिनी मध्ये समविचारी प्रश्न विचारणारे अनेक साथी भेटले. थोडाफार कृतिशील होण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती मध्ये काही जबाबदारी पार पाडताना होतंच होता. अध्येमध्ये पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देत, किंबहुना त्याहून अधिक देत विचाराचा आवाका वाढवणारे अल्बर्ट एलिस, विक्टर फ्रांकेल सारखे अनेक लेखक भेटले. सांस्कृतिक ज्ञानात नाटकांनी भर घातली. थोडक्यात वैचारिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक अंगांनी “The Big Picture” समजून घेण्याचा माझा हा केविलवाणा प्रयत्न होता एवढे मात्र नक्की! मनात जाणून घेण्याची, नवीन शिकण्याची, सांस्कृतिक समृद्धता जाणून घेण्याची इच्छा या अशा सर्व गोष्टींना गरज होती एका विशिष्ठ catalyst ची. माझ्या मते निर्माणने तेच काम माझ्यासाठी केले. माझ्यासारखेच काही गोताखोर इथे मला भेटले. मी कोण आहे? मला काय करायचे आहे? खरंच सोशल मीडिया वर इतका वेळ घालवणे माझ्यासाठी योग्य आहे का? मी माझ्या स्किल्सचा वापर करून कोणते सामाजिक प्रश्न कसे सोडवू शकतो? आजच्या बदलत्या जगात नवीन टेकनॉलॉजी कोणते बदल निर्माण करत आहेत? असेच काही प्रश्न मला देखील पडले होते. आजपर्यंतच्या प्रवासात निर्माण मध्ये अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालीच पण त्याहून अधिक महत्वाचे, अशा प्रश्नांची शोधण्यासाठी mentor, role model, माझ्यासोबत माझे प्रश्न discuss करणारे मित्र मला इथे मिळाले. अम्मा, नायना, विवेक सावंत अशा अनेक सन्माननीय “Ground to earth” व्यक्तींचे विचार जाणून घेण्याच्या प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधीही दिली. सोशल मीडियाच्या किलबिलाटापासून दूर, सर्चच्या सुंदर “शोधग्राम” मध्ये, ८ दिवसाच्या पहिल्या शिबिरात, सकाळी नाश्त्या, दिवसभर सेशन्स, संध्याकाळचा चहा, प्रयेर, रात्रीची शेकोटी, आंदोलनातील रोमांचकारी गाणी, काही कविता, कडक थंडीत झालेल्या कडक चर्चा आणि बरंच काही! अविस्मरणीय असे ते पहिल्या शिबिराचे ८ दिवस! खरंतर इथूनच झाली या रोमांचकारी प्रवासाची सुरुवात! थोडक्यात माझ्यासाठी माझ्या प्रश्नांना उत्तरे देत, माझ्या कलागुणांना वाव देत, स्वतःला जाणून घेण्याच्या प्रक्रियेतील catalyst “निर्माण”! मैं गोताखोर, मुझे गहरे जाणा होगा तुम तटपर बैठे भंवरकी बांते किया करो! ~”हिमालय के आंसू” निर्माणची अकरावी बॅच येत्या वर्षात “सर्च, गडचिरोली” येथे सुरू होत आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी http://nirman.mkcl.org या संकेत स्थळावरून प्रवेश अर्ज डाऊनलोड करावा आणि भरून त्वरित पाठवू शकता. For more details Website - http://nirman.mkcl.org/ Instagram - http://instagram.com/nirmanforyouth/ Twitter - https://twitter.com/nirmanforyouth Youtube - https://www.youtube.com/user/Nirmaanites/ #Nirman #socialChangeMaker #२५:७:२०२०::११:२४:pm
Tags: #nirman, #marathi, #scientific temperament, #self-reflection