Sanket Tambare

← Micro Blog

#७४१ सोबत तुझी रात्रीची असते खूप मोहक…! दूर जरी असशी तू तरी, ऊब तुझ…

Posted
2020-09-02
Type
photo

#७४१ सोबत तुझी रात्रीची असते खूप मोहक…! दूर जरी असशी तू तरी, ऊब तुझ्या किरणांची पोहचण्यास मजपास करते बराच तप! का बरे असे मला वाटे, चांदणे ते बस फक्त माझ्यासाठी असे! भ्रमातच सरत आहेत रात्री अशाच कैक, कदाचित वाट बघण्यातच रात्री जातील अनेक! छद्म सुखातच वाटत आहे म्हणा आता आनंद खरा, अपेक्षा नकोत ना अपेक्षापूर्ती नको, निवांत आहे आयुष्य तसे पाहता जरा! दूर कोपऱ्यात मनाच्या आहे असाच काहीसा आशेचा किरण, तुटेल हा भ्रम, येईल कोणीतरी स्पेशल someone, आणि मग थोडीशी ऊर्जा मिळताच व्यापून टाकेलं अखंड मन!!! ~संकेत #चंद्र #११pm_Diary #२:८:२०२०::११:२८:pm

Tags: #marathi, #love, #nightsky