#७५६ एक ब्लॉग म्हणजे काय? तो कसा सुरू करायचा? फ्री मध्ये ब्लॉग सर्व…
- Posted
- 2020-09-12
- Type
- text
#७५६ एक ब्लॉग म्हणजे काय? तो कसा सुरू करायचा? फ्री मध्ये ब्लॉग सर्व्हिस देणारे कोण आहेत? एक ब्लॉग म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट विषयावरील लेखांचा, एक किंवा अनेक लेखकांनी मिळून इंटरनेट वर प्रसिद्ध केलेला संग्रह म्हणजेच ब्लॉग! ब्लॉग लिहिण्याचा प्रत्येकाचा वेगळा उद्देश असू शकतो, कंपनीच्या प्रॉडक्ट विषयी माहिती देणारा ब्लॉग, एखाद्या लेखकाने आपले विचार मांडण्यासाठी सुरू केलेला ब्लॉग किंवा तंत्रज्ञानातील मोठ्या कंपनीचे नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे ब्लॉग! मी ब्लॉग का लिहितो? मी मला आवडलेल्या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न करतो! मी एखाद्या विषयाचा अभ्यास केला आहे, तो विषय इत्यंभूत समजून घेतला आहे आणि त्याविषयी मला माझी मते मांडायची आहेत, म्हणून मी ब्लॉग लिहितो. एखादा विषय मला समजला आहे की नाही हे जाणण्याची एक पद्धत त्याविषयी इतरांना समजावून सांगणे असू शकते. यापुढे जाऊन त्या विषयावर सर्वांना समजेल अशा भाषेत लेख लिहिल्यावर माझे आकलन अधिक प्रगलभ होते, असेही मला वाटते, म्हणून देखील मी ब्लॉग लिहितो. तो कसा सुरू करायचा? अगदी ५ मिनिटात तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकता. गरज आहे फक्त संगणक/ लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनची. blogger.com या संकेतस्थळाला भेट द्या. त्यावर साइन इन करा. ब्लॉग साठी नाव निवडा. आणि बस, तुमचा ब्लॉग सुरु झाला! फ्री मध्ये ब्लॉग सर्व्हिस providers: १. blogger.com 2. Wordpress.com काही ब्लॉग्सची उदाहरणे: Blogs | YFNINDIA https://daredavil01.blogspot.com Dare Write’s ~संकेत…🙂 #१२:९:२०२०::४:१९:pm
Tags: #marathi