Sanket Tambare

← Micro Blog

#759 #असचएकआवाहन काही जण नैसर्गिकरीत्या झोपलेले असतात, थोडेफार जागे…

Posted
2020-09-13
Type
text

#759 #असचएकआवाहन काही जण नैसर्गिकरीत्या झोपलेले असतात, थोडेफार जागे करण्याचा प्रयत्न केला की, ते जागे होतात, त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होते. आपल्या आसपास काय चालू आहे याची जाणीव होते. अशीच परिस्थिती राहिली तर, पुढील परिस्थिती काय होऊ शकते, याविषयी ते थोडीफार दिशा दिली तर विचार करू शकतात. यासाठी फक्त गरज आहे, समोरच्याचे विचार मुक्तपणे ओपन mindedly समजून घेण्याची. असे व्यक्ती बदलू शकतात. काही जणांनी झोपेचे सोंग घेतलेले असते, त्यांना त्यांच्या शिवाय कोणीही जागे करू शकत नाही! काही जणांचे असे म्हणणे असते की मी म्हणतोय तेच खरे आहे, स्वतः च्या विश्वात मजेत असतात. मी, माझा फायदा, माझ्या आसपासचे लोक म्हणजेच संपूर्ण जग अशी काहीशी त्यांची भावना असते. अशांना फक्त एकच सांगेन डोळे उघडा, आसपास डोळस होऊन बघा आणि दुसऱ्यांच्या म्हणण्याविषयी थोडा rational होऊन विचार करा. या परिस्थितीला मी एकटा बदलू शकत नाही, म्हणून मी तसा विचारच करणार नाही, अशी भूमिका सोडा. मला फक्त एकच म्हणायचे आहे, माझ्या आजच्या भूमिकेविषयी मला उद्या पश्र्चाताप होणार नाही, असे वागा आणि यादृष्टीने विचार करा. जेव्हा आजचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तुम्ही योग्य बाजूला असाल यादृष्टीने विचार करून आपली भूमिका ठरवा. बाकी योग्य- अयोग्य तुम्ही जाणताच! अनेक मुद्दे आहेत, fascism, अधिकारशाही, लोकशाही, विचारांचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, तरुण, ढासळलेली अर्थव्यवस्था, त्याचे तुमच्या आयुष्यावर होणारे परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, शासनाचे धोरण, समाजात होणारा अन्याय, खरंच भारत देश हिंदू राष्ट्र आहे, भारताचा प्रगल्भ इतिहास, तरुण, तरुणांची भूमिका, Purpose, खरंच पैसा हेच सर्वस्व आहे, संविधान, माझे हक्क, माझी कर्तव्य, ही हिटलरशाही नाही का, अशा कैक विषयांविषयी स्वतः ची मते ठेवा. काळाची गरज आहे. हे युग information age आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ “पत्रकारिता” जवळपास कोसळला आहे.चहूबाजूंनी तुमच्यावर माहितीचा, विचारांचा भडिमार होणार हे नक्की आहे. इथे प्रत्येक गोष्ट, भूमिका, मांडलेले मत, कृती political आहे. त्यामागे स्वार्थ आहे, मांडणी करणाऱ्याचा स्वतःचा हेतू आहे, प्रपोगांडा पसरवणे, स्वतःचा व्यवसाय वृद्धिगत करणे, इथपासून फेक न्यूज पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, मूळ मुद्यांपासून बहुजनांचे मन distract करणे, असे अनेक हेतू आहेत. बोलणाऱ्याचा हेतू पाहण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडिया सर्वात मोठे manipulation टूल आहे. फक्त विचार स्वीकारण्याच्या आधी या सर्व गोष्टींचा देखील विचार करा. तुम्ही जाणते आहात, तुमचे भले कशात आहे हे तुम्ही जाणता. २० पैशाला आपले मत विकू नका. भक्ती असूद्या की, अंधभक्ती नको! बाकी, पंतप्रधान “सब चंगा सी” म्हणतायत म्हणून सर्व काही ठीक आहे, असे मानू नका, डोळस व्हा. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. #youth #thoughts #information_age

Tags: #youth, #self-reflection, #information age, #digital manipulation