#८१६ #थंडी ❤️ गुलाबी, बोचरी, अंगाला गारठून टाकणारी!😃 ट्रेन मध्ये व…
- Posted
- 2020-10-15
- Type
- text
#८१६ #थंडी ❤️ गुलाबी, बोचरी, अंगाला गारठून टाकणारी!😃 ट्रेन मध्ये वाजणारी, कडक हिवाळ्यात उबदार रजई मधून बाहेर न पडू देणारी थंडी, पहाटेच्या वेळी रस्त्यावर बाहेर फिरताना वाजणारी थंडी, रात्री नाईट आऊट ला गेल्यावर सुसाट गाडीवर वाजणारी थंडी, आणि बरंच काही!🏍️ आणि त्यात जर चहा भेटला तर उत्तमच!🍮 खरंतर तीव्र थंडीच्या आठवणी अनेक आहेत. ❣️ सकाळी सकाळी अगदी पिण्याच्या पाण्यालाही बर्फासारखे थंड करणाऱ्या थंडीत एक वेगळीच मजा होती!😉 ऐन हिवाळ्यात थंड रात्री स्लीपर कोच मध्ये कोणत्याही पांघरूनाशिवय प्रवास करण्याची मजा देखील वेगळीच होती म्हणा!🚂🚞🚃 त्यात सकाळ सकाळ गरम गरम पोहे आणि वाफा येणारा चहा, याची तल्लफ देखील वेगळीच होती म्हणा!😋 रेल्वे स्टेशन वर वेटींग रूम मध्ये घालवलेली थंड रात्र देखील वेगळीच होती म्हणा!😄 मध्यरात्री प्लॅटफॉर्म वर ट्रेन ची वाट बघण्याची आणि मोकळा श्वास घेतलेल्या प्लॅटफॉर्म ला पाहण्याची मजा वेगळीच होती म्हणा!🤩 अगदी सकाळी ४ वाजता ट्रेन मधून उतरल्यावर बाहेर थंडीत आपली वाट काढण्यात वेगळीच मजा होती म्हणा,😉 तेही जर प्रयत्नपूर्वक जागून काढलेल्या रात्री अगदी शेवटच्या अर्ध्या एक तासात झोपेतून वेळेवर निद्रानाश झाला तर ठीक, नाहीतर आहेच पुढचे स्टेशन!🤭 अशातच थंडगार पहाटेस सकाळ सकाळी उठल्यावर गरम पाण्याने अंघोळ करण्याची मजा वेगळीच होती म्हणा!🧖♂️ ३१st night ला १२ वाजता थंडीत मेणबत्ती वर बॉडी स्प्रे मारण्याची मजा देखील वेगळीच होती म्हणा! 🔥(टीप: असे काही करू नका, घरात आग लागण्याची शक्यता आहे.)😜 ऐन थंडीत श्रमदान करण्याची मजा देखील वेगळीच होती म्हणा!😎 खरंच किती रंग, किती रूप, पण या अशा थंडीत साजूक तुपातला गाजराचा हलवा, जोधपुरी जलेबी, गरम दूध, समोसा, चहा आणि पोहे असा नाष्टा करण्याची मजा वेगळीच होती म्हणा!🍔🥣🌭😍🤩❣️ #माझी_थंडी ❤️ #१५:१०:२०२०::६:०८:am