Sanket Tambare

← Micro Blog

#८४९ #असच व्यक्त व्हावं वाटलं म्हणून…! बघा पटतंय का? The informatio…

Posted
2020-11-04
Type
text

#८४९ #असच व्यक्त व्हावं वाटलं म्हणून…! बघा पटतंय का? The information environment is toxic! A lot of stuff is happening around you starting from racism, religious hatred at international level, pseudo ~nationalism~, religious provocations, obsurdly meaningless reasonings, simply a chaotic chaos! It’s hard what to believe, what not to believe, what to give attention to and what not to give attention to in gigantic web of information! It matters to me although however obsurd it might seem to be! So, be aware of all these things happening around you, have your own stand on these topics, but don’t merge yourself in the wave spreading hatred citing reasonings of historical events! तुमच्या आसपासचे वातावरण खूपच toxic होत असं वाटत नाही का? भरपूर गोष्टी होत आहेत, धार्मिकता, (खोटा)राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रान्स मध्ये झालेली घटना आणि त्याचे उमटलेले पडसाद, लव्ह जिहाद, वगैरे वगैरे! कशावर विश्वास ठेवायचा, कशावर ठेवायचा नाही, किंबहुना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे नाही, ह्या सर्वांचा विचार करावा लागेल असे वाटते! पण सर्वात महत्त्वाचे त्यासाठी विचार करावा लागेल एवढे मात्र नक्की! एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या वक्तव्यावर किंवा खोटा राष्ट्रवादाचा प्रपोगंडा पसरवणाऱ्या व्हिडीओ वरून आपली मते बनवणे टाळावे एवढे मात्र नक्की! तुमच्या आजूबाजूला काय होतंय याची माहिती नक्की घ्या, त्याविषयी तुमची भूमिका काय आहे याचा देखील विचार करा, पण ऐतिहासिक कारणे देत धर्मा धर्मा मधील द्वेष पसरवणे टाळा! केबीसीमध्ये मनुस्मृति विषयी विचारलेल्या प्रश्नांमुळे जर धार्मिक भावना दुखावत असतील तर तो राजकीय धार्मिक द्वेष वाढवण्यासाठी केलेली कृती आहे की लोकनियुक्त नेत्याने लोकांच्या विकासासाठी केलेली कृती; एवढे समजण्यापुरते तुम्ही सुज्ञ आहातच असे वाटते! बाकी सब चंगा सी! #SankyWrites #4:11:2020::9:57:am

Tags: #information age, #politics, #marathi, #digital manipulation