Sanket Tambare

← Micro Blog

#८७० नववर्ष आले हे नवे, उजळून जातील हे दिवे सारे! बनतील कैक अनाकलनी…

Posted
2020-11-14
Type
text

#८७० नववर्ष आले हे नवे, उजळून जातील हे दिवे सारे! बनतील कैक अनाकलनीय कथा या सालात ही, जुन्या संकल्पांचे फलितही दिसेल बहुदा! इच्छा आहे एकची आता, संकल्प आहे उल्लेखनीय असा, ठरविले होते काही या गत वर्षात, अडचणीमुळे अडथळ्यांमुळे राहिल्या काही गोष्टी जरी आता, मनोबल देशील रे, भल्या ईश्वरा! एकटेच आहे चालणे जरी आता, साथी आहेत अनेक अल्प काळासाठी आता, वेगळी ही वाट, बिकट हा प्रवास, अंधार हा कठीण, पण पोहचेल इच्छित स्थळी नक्की मी आता, वाटेतल्या आठवणींनी उजळले आहे आयुष्य सारे, त्यातच आहे ना सुख सारे! सोबती आहात तुम्ही, वाटे अभिमान मज आता मला याचा, मिळूनी गाठुया नवीन उंची आता, होतील ती अथांग शिकरे पादाक्रांत आता! #दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳 #SankyWrites #१४:११:२०२०::१:३७:am

Tags: #marathi, #life, #sanky, #personaldevelopment