Sanket Tambare

← Micro Blog

#८८९ #मनातलं Wake up! See what’s happening around you with wide ope…

Posted
2020-11-28
Type
photo

#८८९ #मनातलं Wake up! See what’s happening around you with wide open eyes! The lessons from the history, unrealistic announcements, promotion of religious hatred, overall it’s clear transparent diversion from the critical issues to issues like “Love Jihad”! The collective societal choice today will define where we stand today! So wake up “BHAKTS”…! उठा, जागे व्हा! आपल्या आसपास काय चालू आहे हे धार्मिक चष्मा काढून पाहा! इतिहास महत्वाचा आहे, पण या आधुनिक जगात ऐतिहासिक पुरावे देऊन आजच्या कृतीचे समर्थन किती योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करावा असे वाटतं. त्या कृती भविष्यात येऊ घातलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कितपत मदत करतील, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. “ग्लोबल village” ची संकल्पना पुढं येत असताना धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाला आपण किती बळी पडणार आहोत? बडे वादे, मोठ्या गोष्टी, मोठी स्वप्ने पाहणे महत्वाचं आहेच, पण त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचं जर त्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील, तर त्याबद्दल थोडा विवेकी होऊन, ही खरंच on-ground situation आहे का की एक पॉलिटिकल स्टेटमेंट याचा मागोवा नक्की घ्या. उठा, जागे व्हा! तुम्ही सर्वजण जाणते आहात, याबद्दल खात्री वाटते. फक्त डोळस, विवेकी, भविष्याचा मागोवा घेऊन आपली मते ठरवाल ही अपेक्षा! ~संकेत #२८:११:२०२०::८:१४:am

Tags: #politics, #marathi