Fifty kilometres at Lonavala — February 2026

- Issue
- February 2026
- In numbers
- 85 km raced, 1 book, 4 posts written
Dear reader,
February was the longest month on the road so far: eighty-five kilometres of racing and training. A 25K training run on the Sinhagad hills, the IPA Neerathon 10K in Pune in 55:28, and then the one that mattered — the Tata Ultra Marathon at Lonavala, fifty kilometres in a little over seven hours.
A short post asked, half seriously, why I am running this much. I still do not have a clean answer; the running seems to be how everything else gets sorted out.
On the shelf, Make Time by Jake Knapp and John Zeratsky, reviewed on the blog. Nemade's Hindu came up in a short post too, and the question of what Khanderao's inner conflict really was. I wrote about the digital self in an AI world, about the timidness of time, and about the 50K itself.
I also built RunLog, a small tool for keeping those kilometres, and heard Atish Dabholkar and Vivek Sawant in conversation, with an AI Study Group at Aeka's Cafe in Baner to close the month.
On the road
- Sinhgad Hills Training Run
- Tata Ultra Marathon
- IPA Neerathon 2026
Treks & outings
- Atish Dabholkar & Vivek Sawant Talk
- AI Study Group, Aeka's Cafe, Baner
On the shelf
Written
- The digital self in AI World!
- The timidness of time!
- Book Review: Make Time - How To Focus on What Matters Everyday
- Tata Ultra Marathon 50 Kms Challenge
Short posts
- #1369 नेमाडेंचे “हिंदू” वाचल्यावर, खंडेरावच्या मनातील द्वंद्व किती प्रगल्भ पण टिकतेच उलगडलेले होते, याची थोडी कल्पना येते. एका बाजूला वारसाहक्काने आलेलं गावातले स्थान आणि दुसऱ्या बाजूला अनुभवातून स्वतःला प्रगल्भ करू पाहणारे एक उत्साही मन!🤍 बंधनं तशी भरपूर पण त्यांना झुगारून नवी क्षितिजे पाहण्यास उत्सुक मन, एक वेगळीच आशा बाळगून भारावून जगणारा खंडेराव!🤹 काय हवे आहे त्यापेक्षा काय नको आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांना जगून पाहणारा तो हळूहळू स्थैर्याकडे जातो!🧘♂️ खोल मनातील एक एक पदर उलगडत आपल्याच मनातल्या खोल डोहात कधीतरी रमत, वेगवेगळे अंतरंग जणू काही तो आयुष्याच्या या canvas वर रंगवत असतो! सुरुवातीला अंधुक वाटणारे ते चित्र हळूहळू आपले अंतरंग खुलवते! शेवटी तो सुंदर, विस्तृत, प्रगल्भ पट पाहिला की आपणच हा पट रंगवला का, हा प्रश्न या मनास पडतो!🖼️ या सर्वात महत्वाचे ठरते, या चित्राला रंगवणारे मनातले स्थैर्य, शांतता, संयम आणि या प्रक्रियेवरील विश्वास!❣️ बाकी गोष्टी सोप्याच असतात, दुरून फक्त कधी कधी त्या क्लिष्ट आणि खोचक वाटतात इतकेच!❤️ #५:०२:२०२६::११:४७:am
- #१३७० #खंडेराव_उवाच निवडणुका आता बदलल्या आहेत. राजकारण, समाजकारण आता अर्थकारणामध्ये बदलल आहे. Freebies, पैसा, मद्य याच्या जोरावर सर्व खेळ सुरू आहे! समृद्ध पश्चिम महाराष्ट्र आणि तुलनेने कमी प्रगत मराठवाडा पाहिला की ते प्रकर्षाने जाणवते! एका गावात एका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करोडो रुपये येत असतील आणि त्या गावात रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव असेल. तरीही जर तेथे निवडणुकीमध्ये पैसाच वरचढ ठरत असेल, तर त्या गावाला विकासाचा अधिकारच नाही असे म्हटले तर वावग ठरणार नाही! अहो ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याचे संपूर्ण बजेट आणि या निवडणुकीत मिळून होणारा सर्व खर्च पाहिला, दोन्ही पारडी सारखीच ठरत असतील तर, ही शोकांतिका नाही का! इथे बँकेत जमा झालेल्या व्याजावर पण income tax भरावा लागतो आणि तिथे करोडो रुपये असेच या व्यवस्थेमध्ये फिरत असतील तर या व्यवस्थेवर विश्वास कसा राहिल? बाकी, तू तुझे पाहून घे, शिकत रहा, एका जागी अडकू नकोस; जग खूप मोठं आहे, तू तुझी भ्रमंती थांबवू नकोस! #०९:०२:२०२६::०८:४३:pm
- #1371 Often it’s not easy to find that gem in the wide ocean, but persistent efforts do matter and pay off…!🤠 Searching that beauty gem in the vast ocean!😎🧘♂️🏃♂️🧑💻😇❣️🤍 #9:2:2026::09:32:pm
- #1372 A random thought experiment!🤔 Why am I running this much?🏃♂️ Maybe all this running is helping to juggle all the stuff that I am trying to balance: office work, running, writing, reading, trekking, blogging, AI exploration and much more!🤹🏻 Or is it helping me to skip the big questions that I must tackle now?🫣 Don’t know if all is worth the effort, but it feels beautiful when things pile up and something significant happens along the way!✨ When overlooked, everything just happens to be in motion and things change dramatically across the axis of time, just like something magical!💫 But, it’s these early mornings, efforts, that pile up!🤍 Just like that, you convince your tired mind to keep up the spirits high!❣️ #11:02:2026::09:24:pm
- #१३७३ #खंडेराव_उवाच आयुष्यात माणूस जेवढ्या गोष्टी अनुभवतो, वेगवेगळी आयुष्य जवळून बघतो, तेवढं आपल्या आजच्या निर्णयाचा, उद्या किंबहुना येणाऱ्या आयुष्यात होणाऱ्या परिणामांचा, विचार तो करू शकतो! धावणं/ कोणताही व्यायाम तसा शरीरासाठी चांगला! मग ते १०-१२ किमी असत तर ठीक होते, पण ५० किमी वगैरे पळण्याचा माझा अट्टाहास का याचा विचार करत होतो! रोज स्वतःसोबत १-१.५ तास मिळतो ही जमेची बाजू, पण ५-६ तास सलग पळत राहणं, यातून एक वेगळीच अनुभूती, ऊर्जा मिळते! “I am enough for me and I can conquer whatever I decide to” कदाचित या विचार त्यामागे आहे! पण त्यामुळे इतर गोष्टीही अगदी समर्पकपणे चालू आहेत, काम, लिहीन, वाचन, ब्लॉगिंग, AI , वगैरे, वगैरे! सोशल मीडिया वरून बाहेर पडल्यावर एकट्या मनाला काहीतरी विसावा हवा. सतत काहीतरी पाहत, ऐकत, मिळत राहणारे dopamine hits इतक्या सहज कस बर सुटतील! कदाचित त्याच्यावर running हा उपाय असावा, स्वतःला कशा मध्येतरी गुंतवण, त्यातून होणारा बाकी शारीरिक, बौद्धिक, मानसिक फायदा वेगळाच! बाकी, ही आयुष्याची कोडी सोडवायला तुला या आभासी सोशल मीडियाच्या बाहेर पडावं लागेल, एवढ मात्र नक्की, नाहीतर या प्रवाहात तू कधी वाहत गेलास, हे तुला समजणं तसे अवघडच होईल! #११:०२:२०२६::०९:२५:pm
- #1374 Not everyday is going to be exciting, interesting! Somedays, you will be alone, injured, yet resting well to rise up once again! Though it’s true that you are the hero of your own movie, heroes do need to be down, to prepare for the storm ahead! Living a calm social life has dual aspects, one being the soothing mind and other being the choice to endure and nurture your own soul! In such times, one just prompts himself to believe in the process and keep doing what matters the most! Things often resolve and culminate into something beautiful, but that needs that endurance, that patience to keep doing what matters the most! #17:02:2026::11:05:pm
- #1375 #खंडेराव_उवाच✍️ खंडराव, उलगडलेले आयुष्य उमजण्यासाठी जरा बाहेर पडुन भटकंती केली की मन मोकळं होत.✨ आपण जे काही अनुभवतो त्याचे आकलन चालूच असते. पण सखोल समग्र चित्र पाहायला मोकळं मनच लागतं.🖼️ शहराच्या कल्लोळात कुठेतरी टेकडीवर ते थोडफार होत पण खरी मजा तर निसर्गात रमण्यातच आहे.🏕️ मग विचारांच चक्र चालू होते.🤔 मी काय करावे, काय करू नये, का करावे, हे केल्यावर नक्की काय होईल अशा अनेक प्रश्नांची उकल चालू होते.😀 हळूहळू नकळत तुम्ही शांत होता. मनातला कल्लोळ थांबतो. चंचल मन मग समोरच्या दृश्यामध्ये रमून जाते. मग ते समुद्राच्या लाटा असो, विस्तीर्ण नदीपात्र, रांगडा सह्याद्री किंवा शांत निसर्ग!🧘♂️ मन एकरूप होते, शांत होते, न सुटलेले प्रश्न सुटतात, गोष्टी दृढ होतात आणि पुन्हा त्या कल्लोळमध्ये स्थितप्रज्ञ होण्यास तुम्ही तयार होता!❣️ याची जाणीव असणं, स्वतः वर स्वतः चा कंट्रोल असणं, हे सर्व करायला मिळणे यातच खरं स्वातंत्य आहे असं वाटतं!❤️ बाकी तू कधीतरी अस राहून तरी बघ, तांत्रिक जगामध्ये अडकून त्यात हरवण्यापेक्षा आपणच आपल्या मनाच्या खोल डोहात जाऊन त्याचा मागोवा घेण्यात एक वेगळीच मजा आहे, हे मात्र नक्की!🤍 #२८:०२:२०२६::१२:४७:am