Waterfalls, forts and seven builds — August 2026

- Issue
- August 2026
- In numbers
- 42 km raced, 2 treks, 1 book
Dear reader,
August was full on every front. Two half marathons — a self-paced one up Sinhagad, and the NMDC Hyderabad Marathon — and two monsoon outings that both became Marathi posts: the roaring Lingya waterfall and Ghangad, a remote and beautiful fort.
On Independence Day I went with the Yung Foundation to the Satpuda ranges, and for the first time hoisted the flag in one of the Adivasi padas.
It was also the busiest month for building: seven projects. RunFolio, a new visiting card, E20 ka Chakravyuha, websites for the Antyodaya and YUNG Foundations, a school management portal for Nisarg School — which taught me enough about offline-first design to fill a post — and a site planner.
On the shelf, Santosh Shinde's पट्यारा. Strava counted about 146 kilometres and 2,355 metres of climbing, the most elevation of the year.
On the road
Treks & outings
On the shelf
Written
- लिंग्या धबधबा: रौद्र निसर्गाचे एक सुंदर प्रारूप!
- What designing offline first School Management System taught me?💯
- घनगड किल्ला: एक दुर्गम पण सुंदर किल्ला!
- Finishing the circle of life, started long ago!
- The midnight speaks!
- हरवलेले स्वातंत्र्य शोधताना…!💭
Short posts
- #1442💯 खंडेराव,✨ कोणतंही कोड उलगडन तसं अवघडच, मग ते आयुष्याचे असेल तर त्याला विविध कांगोरे असणं साहजिकच!🧩 प्रत्येकाचे आपले एक विश्व असते, त्यात त्याचे मित्र, संबंधी आणि ज्याच्याविषयी त्याला जुजबी माहिती आहे असे काही ठराविक!🗺️ भटकंती याच्या परिघाला वाढवते, कधी नवीन प्रश्न पडतात, कधी जुनेच न सुटलेले प्रश्न डोके वर काढतात!🧭 व्यक्ती तशा कथा आणि व्यथा, अनुभवलेला माणूस जेव्हा काही कालांतराने बदलतो, तेव्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्यावरती श्रद्धा ठेवावी का हा प्रश्न असतोच, पण त्यापेक्षा अधिक प्रकर्षाने जाणवलेली भावना असते, "is this part of my tribe?"!🤔 थोड जास्त निरिक्षण केले की अशी व्यक्तींची किचकट कोडी सुटतात, एखाद्याचा आयुष्याचा साचा जाणवतो आणि आपल्या परिघात तो बसेल का याची जाणीव होते!🧘 आभासी जगातील आभासी अनुभव टाळून आपण आपलं आयुष्य जगत राहिल तर किती प्रश्न असेच सुटतात ना!❣️ ना कधी कोणाला पाहणे, ना त्या जागा पाहणे; माणसे मागे सुटतील, पण जी अशीच मागे सुटतात, त्यांना परिघात ठेवण्याचे प्रयत्नच का करावे हा यक्ष प्रश्न आहेच म्हणा!🌱 बाकी, तुझ्या मार्गावर तू आहेसच, गरज आहे, नितळ, निर्मळपणे आयुष्यात सोबत असलेल्या साथींची!❤️ #०४:०८:२०२६::१२:३३:am 🕰️
- #1447❣️ Well, at the end of the day, isn't everything, just another act of stream/ thought/ memory, to weave your inner universe...?🌱 It's up to you, what you choose to embed and how far you are willing to stretch/ explore and adapt?💯 #life...❤️ #17:08:2026::10:22:pm
- #१४४६✨ खंडेराव, कधी पुल वाचताना किंवा नाटक पाहताना व्यक्ती आणि त्याचे अंतरंग याचं एक वेगळच प्रारूप दिसतं!🤍 एखादा किती वरवर बोलत आहे किंवा एखादा खरंच जगुन आयुष्याचे कांगोरे मांडत आहे हे जाणवत!✍️ बहुदा स्वतःला स्वच्छंदी दाखवणारा, या देखाव्याला कधीतरी कंटाळत असेल का?🤔 आभासी जगामध्ये रमत, फक्त तिथे स्वतःच्या प्रतिमेला मोठं करण्यासाठीच कोणी काही करत असेल तर, त्याचा परीघ कधी त्या आभासी जगाच्या पलीकडे गेला नसेलच ना?😶🌫️ तसं व्यक्ती हे कोड सोडवण कठीणच, unfiltered माणसं मिळणे तसे जवळपास अशक्यच!🤞 पण यामध्ये आपणही mask घालून किती दिवस वावरणार ना?😑 मग त्यापेक्षा आपण स्वतः मध्येच गुंतणे नक्कीच परवडणारे!🧘 बाकी, आपण आपल्या मार्गाने चालत राहण, भेटणारे योग्य वेळी भेटून जातीलच!🌱 #०७:०८:२०२६::११:२३:pm ⏰
- #१४४५💯 खंडेराव,🤍 कधीतरी जेव्हा आयुष्याच्या पटलावर उमटलेले चित्र पाहतो, तेव्हा त्याला त्याच्या भटकंतीच्या परिसिमांची कल्पना येते!🗺️ आयुष्याचा धांडोळा घेताना कधी खंडेरावप्रमाणे गाव दिसते, शिकलेले शहर दिसतं, अनुभवलेला प्रदेश दिसतो, तिथली माणसं आठवतात, जवळच्या आठवणी मनात कल्लोळ करतात!✨ सोशल मीडिया, सामाजिक माध्यम या सर्वांभोवती एक आभासी आवरण तयार करतात, जे तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवते!🌐 अशा अनेक आभासी जगांमध्ये बहुदा सर्व जणच असल्यामुळे एखादा व्यक्ती त्यात अडकतो!🤞 त्यात रमण्याचे फायदे आहेतच, पण त्याचा मानवी क्षमतांवर होणारा परिणाम कधी कळतंच नाही, आणि कळाला तर पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो!🤫 त्यामुळे अशा वाटेला सहसा कोणी भटकंती करताना भटकत नाही!✨ पण असं जगुन पाहिले तर गोष्टी सोप्या नक्कीच होतात!💫 न सुटलेले प्रश्न सुटतात, न उलगडलेली कोडी एकतर सुटतात, किंवा त्यात अडकण्याची गरजच नाही याच शहाणपण येत!🌱 बाकी, गोष्टी चालूच राहतात, गरज आहे त्याला एक सातत्य, नाविन्यतेची जोड देण्याची!❤️ #०७:०८:२०२६::११:०६:pm⏰
- #१४४४💯 खंडेराव,❤️ एखादा व्यक्ती, जागा यांच्या आठवणी दडवून त्यांना विसरणे शक्य आहे का?🤔 प्रदीर्घ कालावधीसाठी त्याचे काहीच दिसले नाही, तर ती गोष्ट विस्मृतीत जाईल, एवढं नक्की!💫 आभासी जगात असणाऱ्या हजारो मित्रांपैकी खरंच किती आपल्याला ओळखतात, हा मोठा प्रश्न नक्कीच आहे!🤫 जर फक्त तोंडओळख असेल तर त्यांचे रोजच्या अपडेट्स बघण्याची खरंच गरज आहे काय?🤞 नर्मदेच्या खोऱ्यातील नितळ माणसं अनुभवली की आपोआपच एक वेगळी दृष्टी भेटते!🌊 तुम्ही संवादाच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या मनातील गोष्टी चाचपडून पाहता आणि हळूहळू ओळखायला लागता!🤍 मग ज्या ठिकाणी "This is not my tribe" असं प्रकर्षानं जाणवत त्या व्यक्ती, जागा आपसुकच मागे पडतात!🚂 हा कदाचित selfishness वाटू शकतो, पण ही ज्याची त्याची भटकंती असते!🌱 आणि वारंवार असं काही दिसतं राहिलं की गोष्टी दृढ होतात!✍️ It's as if your presence does not matter anymore!😑 मग अशा वेळी तेथून निघणे आणि आपण आपला पंथ शोधणे, हेच गरजेचे!🏞️ जितके स्वतःच्या मनाला पटत नसेल, तर आपण एखाद्या गटात जुळण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे हे खरे, तितकेच व्यक्ती मागे सोडणे महत्त्वाचं!😶🌫️ बाकी, तू सूज्ञ आहेसच, गरज आहे, अशा परिघातून बाहेर पडून खरंच स्वतःच्या परिघात जाण्याची! ❣️ #०५:०८:२०२६::१२:२६:am⏰
- #1443🎉 With the experiences, comes the wisdom of choice, the wisdom of what to think about, what not to think about, what to do, what not to do and most importantly what's at stake and what isn't!✨ Expectations come at the cost of anxiety and possibility of unfulfillment!🤔 Knowing and enforcing what one does not wish to do in the presence of the worst possible distractions, is the vital and important thing to maintain the sanctity of that routine!🧘 Though, keeping oneself high in one's expectations, is the necessary first step, but what needs furthermore is the clarity and why you are choosing to do what you are doing!🤞 Yet, when one chooses to be wise and do everything one can to be thy best version, the initial friction is difficult to pass; but when does that, the unstoppable self begins there!🌱 So, learn to be wise and it all starts with small choices!💯 #04:08:2026::07:02:pm🕰️
- #१४४८❤️ खंडेराव,💯 दूर कोण्या डोंगरावरून, किंवा शांत निश्चल समुद्र किनाऱ्यावरून एखादा जेव्हा आजूबाजूच्या निसर्गात हरवून जातो तेव्हा त्याला दिसतो, विस्तीर्ण पसरलेल्या त्याचा विस्तार, न थकणारा वारा, न थांबणाऱ्या लाटा आणि बरंच काही!🏞️🌊 तासनतास त्याकडे पाहत राहील की आयुष्यातील समर्पक लाटा म्हणा किंवा आयुष्याचा धांडोळा म्हणा, आपोआप मनाच्या पटलावर उमटतो.🗺️ निसर्गाच्या सौंदर्याने मोहित झालेले हे मन, त्यासारखेच शांत, निश्चल आणि स्थिर होते.🧘 आता हा नकाशा किती विस्तारतो हे ठरते तुमच्या मनाच्या भ्रमंतीवर!🗾 रोज काहीतरी नवीन करत राहण, नवीन गोष्टी करत राहण, नवीन लोकांना भेटत राहणं, विचाराच्या परिसीमांना विस्तारात राहणं तसं अवघडच!🤞 पण एकदा हे कळाले की हीच खऱ्या अर्थपूर्ण आयुष्याची गोष्ट, मग त्यात मन रमत!✨ आभासी सोशल मिडियाचे जग सोडून खऱ्या जगात माणूस जगू लागतो.🌱 याच प्रवासात असंच कोणी सहप्रवासी भेटतो आणि मग हे अविरत सुरू राहतं!💫 बाकी, भ्रमंतीने विस्तार होईल, पण खरी शांतता निसर्गच शिकवतो! तेवढं त्याच्याकडून शिकून घे, बाकी सर्व होत राहीलच!💚 #१८:०८:२०२६::११:४०:pm🕰️
- #1449💯 A subtle belief that things will turn out to be good drives one to keep doing things that matter.✨ Frustration comes along the way as one traverses the complex space of exploration.😑 One has to either accept the fate as it is or stand still against the odds for the way less traveled.💫 You just keep doing stuff, add that milestone one at a time, incorporate the good habits like running, reading and writing along the way!🤍 It's often not easy to maintain that strong why but you manage to do it for a certain timespan, and realise that's the way forward!🌱 One just has to maintain that mindset of good faith!🤞 #22:08:2026::09:33:am⏰
- #1450💯 People are temporary.🤞 Experiences are permanent.✨ Live the experiences, focus on the moment at the present.💫 People tend to hurt and leave unconditionally.😑 And, what can be better than nature, when it comes to, being forever!🌱 So, cater to the experiences, live life to the fullest and ignore the most that never cared about you, yet you somehow choose to scroll mindlessly and see what they are up to!🤔 Those who are meant to be for the longer times, stay, one doesn't need an extra effort just to be in touch!✌️ #LiveTheExperiences🤩 #ExpectFromSelf🤍 #ControlWhatYouCan🧘 #23:08:2026::12:09:am
- #१४५१💯 खंडेराव,💭 प्रदीर्घ काळ भरपूर गोष्टी करत राहिले की, कधीतरी त्या सगळ्याचा कंटाळा येतो.🤞 कधी लिहिणे, कधी वाचणं, कधी काहीतरी बनवत राहणं, फिरणं, अनुभवातून शिकत राहणं, असं सगळं त्यात आलं!✨ एकाकी मन आडोसा शोधू लागतं.🧘 मनाच्या या पटलावर काहीतरी नवीन करत राहण्याची उर्मी असते, पण कंटाळलेले शरीर थोडं मागे ढकलत!😑 पण एकदा का तो सूर गवसला की, पुन्हा आपल्या गोष्टी करायला ते मोकळं होते!🌱 आपण, आपल्याच लयीमध्ये राहून, नवनवीन क्षितिजाला गवसणी घालत राहण, यात एक वेगळीच मज्जा आहे.💫 कदाचित दुसऱ्यांसाठी बेफिकीर तुम्ही, स्वतःसाठी स्वच्छंदी असता!🧡 आभासी जगामध्ये न रमता, त्याची बंधने झुगारून, आपल्याला आवडेल ते करत राहण तसे तुलनेने अवघड!✌️ पण, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं, प्रदीर्घ काळाच्या संघर्षानंतर या आभासी जगातून सुटला आहे, त्यामुळे त्यात परत गुंतू नकोस एवढंच!🤍 #२७:०८:२०२६::१०:४१:pm⏰
Built
- RunFolio
- Visiting Card
- E20 ka Chakravyuha
- Antyodaya Foundation Website
- YUNG Foundation Website
- Young Foundation Nisarg School Management Portal
- csm-site-planner
This site
- Images compress themselves on upload — every image on the site enters through one function in the admin's…
- Progress bar — the admin had no determinate progress anywhere